ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून*सविस्तर वृत्त असे की निघोज येथील विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांची निघोज येथील शाखेमध्ये नववा वर्धापन दिन आज बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी अतिशय उत्तम साजरा झाला यावेळी विभागीय अधिकारी तसेच शाखाधिकारी निघोज येथील कुऱ्हाडे साहेब तसेच संस्थेच्या मान्यवर व कर्मचारी वर्ग तसेच सभासदांच्या मध्ये अतिशय खेळीमेळी नववा वर्धापन दिन साजरा झाला यावेळी विभागीय अधिकारी यांनी संस्थेची माहिती देताना संस्थेची स्थापना 1979 झाली असून कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे मुख्यालय प्रशासकीय कार्यालय 41 शाखा व विभागीय कार्यालय चार सभासद संख्या 92 हजार एक अधिकृत भाग भांडवल 60 कोटी वसूल भांडवल 43.50 कोटी राखीव व इतर निधी 103.19 कोटी ठेवी 956 कोटी 27 लाख कर्ज 813 कोटी 11 लाख बँक गुंतवणूक 368 कोटी 16 लाख तसेच स्थावरमालमत्ता 34 कोटी 51 लाख खेळते भाग भांडवले बाराशे 28 कोटी 56 लाख एकत्रित व्यवसाय 1769 कोटी 38 लाख व आजपर्यंत संस्थेला सतत लेखापरीक्षण वर्ग मिळालेला आहे असे सांगितले निघोज येथील शाखेच्या प्रगतीबाबत शाखाधिकारी श्री कुराडेसाहेब यांनी आर्थिक स्थिती नमूद करताना निघोज शाखा सभासद 941 शाखा भाग भांडवल 65 पंधरा हजार शंभर ठेवी चार कोटी अकरा लाख दहा हजार चारशे कर्ज 17 कोटी 26 लाख 50 हजार 777 वसूल व्याज एक कोटी 83 लाख 57 हजार झिरो 49 तसेच थकबाकी 3.55% एनपीए 3. 89% नफा निघोज शाखा 45 लाख 37 हजार एकत्रित व्यवसाय 21 कोटी 37 लाख आहे यामध्ये संस्थेचे सभासद व ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोजकर यांनी आपल्या मनोगत संस्थेने सभासदांसाठी लॉकरसुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे विभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले आभार प्रदर्शन श्री दादाभाऊ ढवळे यांनी केले
