देवीभोयरेच्या अंबिकामाता देवस्थानासाठी ‘ब’ वर्ग दर्जाची मागणी
*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून
आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांना पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते श्री देवी अंबिका ट्रस्ट, देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला.
देवीभोयरे येथील अंबिकामाता देवस्थान हे संपूर्ण गोसावी समाजाचे श्रद्धास्थान असून, देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. सध्या ‘क’ वर्ग दर्जा असल्यामुळे निधीची मर्यादा येत असून, ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यास भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होऊ शकतील.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, विकास सावंत, शिवाजीराव जाधव, बाबुराव मुळे, विश्वनाथ गाजरे गुरुजी, एकनाथ बेलोटे, बाबुराव बेलोटे, कमलाकर बेलोटे तसेच देवीभोयरे गावातील मान्यवर उपस्थित होते.
भाविकांच्या सुविधेसाठी आणि देविभोयरे गावातील अंबिका देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार काशिनाथ दाते सर व उपस्थितांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.
