*श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसिद्धीप्रमुख मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे कीनिघोज तालुका पारनेर माता मळगंगेला एक एप्रिल रोजी भगिनींनी हळद लावून यात्रेला सुरुवात केली दिनांक दोन रोजी हनुमान जयंतीच्या सायंकाळी देवीची मानाची काठी मिरवणूक होणार असून तिची गावातून मिरवणूक करून विधीवत पूजा केली जाणार आहे काही कार्यक्रमाला असंख्य भावी भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात काल हळदीच्या कार्यक्रमानंतर माता मळगंगेचे देवीचे भक्त मोठ्या प्रमाणात येतात यावेळेस भक्तांकडून प्रसाद वाटप केला जातो तसेच श्री मळगंगाग्रामीण विकास ट्रस्ट मार्फत व यात्रा कमिटी निघोज यांच्यामार्फत अतिशय योजना बद्दल नियोजन केले जाते हा उत्सव मोठ्या प्रमाणात असून सर्व धर्म समभाव या उद्देशाने या यात्रेमध्ये येणारे उत्सव प्रमुख्याने ज्योतिराव फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कादरी उत्सव तसेच कुंडावरील देवीचे यात्रा यांचा प्रामुख्याने समावेश असतो अतिशय आगळीवेगळी अशी यात्रा भरते विशेषता देवीच्या बारवे त निघणारी घागर दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त अतिशय प्रचंड अशी गर्दी करतात महाराष्ट्रातून या यात्रेसाठी लाखो भाविक येत असून सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट सर्व भाविक भक्तांचे जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर लक्ष ठेवून असते आपणही या घागरीचे दर्शन घेऊन व माता मळगंगेचा कृपाप्रसाद प्राप्त करावा असे आव्हान श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट अध्यक्ष श्री वसंतराव कवाद व विश्वस्त सल्लागार मंडळ समस्त ग्रामस्थ निघोज मुंबईकर मंडळ निघोज तसेच यात्रा कमिटी अध्यक्ष श्री लंके साहेब तसेच सर्व यात्रा कमिटी यांनी पत्रकार द्वारे केले आहे