अळकुटी येथे भाजपचे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ उत्साहात संपन्न
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत निघोज-कान्हूर पठार मंडलाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर अळकुटी येथील कृष्णा टाऊन मंगल कार्यालयात काल आणि आज (दि. २४ व २५ एप्रिल) मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात पक्षाच्या विविध वरिष्ठ पदाधिकारी व तज्ज्ञांनी कार्यकर्त्यांना पक्षबांधणी आणि विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
शिबिराच्या पहिल्या दिवशी, काल (दि. २४ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात श्रीमती गिल्डा मॅडम यांनी 'वैचारिक अधिष्ठान (राष्ट्रभक्ती व समाज)' या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाची मूळ विचारधारा समजावून सांगितली. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष श्री. अनिलजी मोहिते यांनी पक्षाचा 'इतिहास व विकास' यावर प्रकाश टाकला. तर, जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीपजी भालसिंग यांनी 'कार्यविस्ताराची आमची दृष्टी' या विषयावर विचार मांडत संघटनात्मक वाढीसाठी मार्गदर्शन केले. रात्री भोजनानंतर कार्यकर्त्यांसाठी एका विशेष मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी, आज (दि. २५ एप्रिल) सकाळी नाश्त्यानंतर प्रशिक्षणाच्या पुढील सत्रांना सुरुवात झाली. यामध्ये जिल्हा सरचिटणीस श्रीमती शुभांगीताई सप्रे यांनी 'सोशल मीडिया आणि सरल ॲप'च्या प्रभावी वापराविषयी आधुनिक काळाची गरज ओळखून माहिती दिली. प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. भानुदासजी बेरड सर यांनी 'बूथ प्रबंधन' या निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कार्यकर्त्यांना धडे दिले तसेच 'आपल्या सरकारी योजना व त्यांची अंमलबजावणी' यावर सविस्तर मार्गदर्शन केले, जेणेकरून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येतील.
भाजप निघोज-कान्हूर पठार मंडलाच्या वतीने या भव्य शिबिराचे अत्यंत नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय शिबिराला भाजप राज्य परिषद सदस्य श्री.विश्वनाथ दादा कोरडे, राहुल शिंदे पाटील, कृष्णाजी बडवे, अतुल माने, संग्राम पावडे, राहुल नरड, पांडुरंग गाडगे, दिनेशदादा बाबर, तुकाराम येवले, विलास हारदे, मनोहर राऊत, अर्जुन नवले, कानिफनाथ ठुबे, रमेश गाडगे, बाळासाहेब रेपाळे, मोहन काळे, मोहन रेपाळे, गोरक्ष पोटे, विकास सावंत, कमलाकर बेलोटे, संतोष सातपुते, संदीप सालके पाटील, प्रमोद कावरे, बाबासाहेब येवले, विजय काकडे, सुनील चिर्के, भरत ठुबे, सुनील वाफारे, सुयश वाळुंज, दत्तात्रय वाळुंज, पांडुरंग वडणे, निलेश शेळके, सुरेश खणकर, दादासाहेब ठुबे, अनिता बेल्हेकर, मंदा फापाळे, मनसुख कोरडे, हरेराम खोडदे, सीताराम देठे, देविदास राऊत, बन्सी बढे, राजेश गोपाळे, अप्पाभाऊ गोपाळे, पांडुरंग बढे, शरद गोपाळे, विश्वनाथ बेलोटे, अजिंक्य बेलोटे, स्वप्निल पारखे, संजय पावडे, दत्ता शिकारे, दादाभाऊ नरवडे, सीताराम नरवडे, उत्तम जगदाळे, आसिफ मोमिन, नवनाथ सालके, चंद्रकांत शिंदे, सुनील गलांडे, अमोल गायकवाड, डॉ बाबुराव म्हस्के, जालिंदर सालके, अरुण चौगुले, उत्तम पावडे, नामदेव भोसले, बाबू भोसले यांसह भाजप पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. आगामी काळातील पक्षबांधणीसाठी व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण शिबिर कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
