भाऊसाहेब आंधळे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा निमित्त उमेद वाचनालयास पुस्तकांची भेट
सुधीर जावळे पत्रकार शेवगाव तालुका यांच्याकडून
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बारापट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या शाळेतील आदर्श शिक्षक भाऊसाहेब आंधळे यांनी आपल्या तब्बल तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती स्वीकारत एक आदर्श उपक्रम राबविला. सेवापूर्ती दिनानिमित्त त्यांनी सुमारे ₹३५०० किमतीची पुस्तके ‘उमेद वाचनालयास’ भेट देत समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.या सेवापूर्ती समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमासाठी ह.भ.प. पांडुरंग महाराज झुंबड, काशी केदार संस्थानचे मठाधिपती बाबा गिरी महाराज, बोधेगाव बीटचे विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष रमेश गोरे, तसेच केंद्रप्रमुख शहादेव काळे, नामदेव धायतडक, जगदीश बोडखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच लाडजळगावचे लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे, शेकटे खुर्दचे सरपंच लक्ष्मण राठोड, माजी सरपंच जगन्नाथ मारकंडे, नागलवाडीचे बाळासाहेब ढाकणे, भाजपा युवा नेते चेअरमन राजेंद्र डमाळे, संदीप देशमुख, मयूर हुंडेकरी, बोधेगाव सेवा संस्थेचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, पालक
व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारापट्टा येथील पोलीस नाईक अण्णासाहेब वडते हेही सपत्नीक कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी भाऊसाहेब आंधळे यांनी आपला निवृत्तीनंतरचा काळही उमेद वाचनालयाच्या कार्यासाठी तन, मन आणि धनाने सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी निरोगी, सुख-समृद्धीपूर्ण जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी त्यांच्या कुटुंबियांसह परिसरातील
कल्याण मान्यवर बामदळे गुरुजी, पोटभरे, कल्याण कोकाटे, संदीप कातकडे, बळीराम बर्डे, जयसिंग राठोड, विकास वडते, आजिनाथ वडते, परमेश्वर राठोड तसेच १२ पट्ट्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक गुंजाळ व खरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय तहकीक यांनी मानले. भाऊसाहेब आंधळे यांच्या या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळत असून, समाजासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.
