पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामोद्धाराचे प्रतिक- प्रसाद शितोळे
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून
(अळकुटी महाविद्यालयात लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील जयंती उत्साहात साजरी)
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरानगर सारख्या लहानशा खेड्यातून आपली राजकीय कारकीर्द सुरु करत देश पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवीला आहे. राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री आदी मंत्रिपदे भूषवत त्यांनी भारताच्या विकासात महत्वाचे योगदान दिले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविली. राज्यातील पहिले खाजगी तंत्रनिकेतन प्रवरानगर येथे सुरु करत राज्याला एक नवी दिशा दिली. एकूणच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामोद्धाराचे प्रतिक आहेत, असे प्रतिपादन पारनेर खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रसाद शितोळे यांनी केले.
पद्मभूषण लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथे लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रसाद शितोळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी शितोळे यांनी लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल काही विशेष आठवणींना उजाळा दिला. पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य भाऊसाहेब डेरे यांनी पद्मश्री व पद्मभूषण विखे पाटील यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा प्रवरा परिवार जोपासत आहे याचा अभिमान वाटतो असे म्हटले.
या कार्यक्रमाप्रसंगी अळकुटीचे उपसरपंच बाळासाहेब धोत्रे, संपत जाधव, कैलास गोरडे, किरण शेंडकर प्रा. अर्जुन चाटे, प्रा. विशाल रोकडे, प्रा. संजय जाधव, गोरख घोलप, सूर्यमाला भोर, प्रा.सुनिता जाधव, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. दत्तात्रय शेळके, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. स्वाती फापाळे, अमोल नालकर, प्रा. पूजा वैरागर, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. पांडुरंग उघडे, प्रा. अनुराधा गाढवे, डॉ. शांताबाई थोरात, प्रा. संदीप गेटम, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा. राजाराम गोर्डे, प्रा. मच्छिन्द्र बेलोट, नितीन घोलप, सुनिता भालेराव, विकास सोनवणे, छाया म्हस्के, राहुल बोरुडे, मनोहर कनिंगध्वज, सागर शितोळे, मच्छिन्द्र म्हस्कुले, वैजनाथ आवारी, रवींद्र वाघ, शिवाजी कळंबे, पांडुरंग शिरोळे आदी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. कुंदा कवडे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विशाल रोकडे यांनी केले.
