📢 जाहीर आवाहन व निषेध 📢सराफ संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख जेष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून
सराफ सुवर्णकार असोसिएशन, बारामती,
सर्व सराफ सुवर्णकार बांधवांना कळविण्यात येते की,
सराफ सुवर्णकार असोसिएशन, बारामती यांच्या वतीने
दिनांक: ०६/०५/२०२६ (बुधवार)
या दिवशी अहिल्यानगर येथे झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ
👉 एक दिवस संपूर्ण सुवर्णपेठ / दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
अहिल्यानगर येथील श्री. भगवतजी अदापुरे व इतर सराफ बांधवांवर झालेल्या अन्यायकारक मारहाणीचा निषेध करत, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी व गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
👉 सर्व सराफ बांधवांनी सहकार्य करावे व अहिल्यानगर येथे जाण्यासाठी ठीक सकाळी 8:30 मिनिटांनी आबा गणपती, तांदुळवाडी वेस येथे जमावे
पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे उपस्थित राहून निषेध नोंदवावा.
🙏 आपले सहकार्य अपेक्षित आहे
आपले विश्वासू,
श्री. भागवतशेठ ज्योतिराम पंडित
अध्यक्ष
सराफ सुवर्णकार असोसिएशन, बारामती
