🚨 जाहीर निषेध 🚨
⛔ बंद….. बंद….. बंद….. ⛔
सराफ संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख श्री मुकुंद निघोजकर यांच्याकडून
सराफ संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. उमेशजी बुऱ्हाडे,
संपर्क प्रमुख मा. श्री. अतुलजी पंडित,
उपसंपर्क प्रमुख मा. श्री. उमेशजी बागडे,
तसेच सराफ बांधव श्री. भागवतजी आधापुरे, श्री. संजयजी बुऱ्हाडे आणि श्री. संकेतजी बुऱ्हाडे यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत.
संबंधित पीएसआय गणेश देशमुख यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, तसेच संबंधित डीबी टीमवर कठोर कारवाई करून त्यांनाही सेवेतून हटविण्यात यावे, ही आमची ठाम मागणी आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस पाठिंबा मिळत असताना देखील, तसेच आवश्यक पुरावे दाखल करून देखील पोलिस प्रशासनाकडून संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. उलट संविधानिक मार्गाने सुरू असलेले आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही दलाल व बाजारभुंग्यांचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
या सर्व घटनेच्या निषेधार्थ —
📅 दि. 08/05/2026 रोजी
🛑 संपूर्ण महाराष्ट्र बंद 🛑
महाराष्ट्रातील सर्व सराफ, सुवर्णकार तसेच संलग्न आटणी, बुलियन व इतर व्यावसायिक बांधवांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून या आंदोलनाला ताकद द्यावी, असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
➡️ तरी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संबंधित बांधवांनी या बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या एकजुटीचे भव्य प्रदर्शन करावे, ही नम्र विनंती.
⚠️ महत्वाची सूचना :
कोणत्याही प्रकारची आक्रमकता दाखवू नये. संविधानिक आणि शांततामय मार्गानेच निषेध नोंदवावा.
आपल्या स्थानिक वृत्तपत्रे व न्यूज चॅनल प्रतिनिधींना या प्रकरणातील कारवाईबाबत माहिती व बाईट द्याव्यात.
✊ एकजूट • संघर्ष • न्याय ✊
🚩 जय महाराष्ट्र 🚩

